‘बहुरूप गांधी’ हे मूळ बंगाली भाषेत लिहिलेलं पुस्तक. ते अनु बंदोपाध्याय यांनी 1949 साली लिहिलं. म्हणजे गांधीजींच्या निधनानंतर लगेच दोन वर्षानी.
मराठी अनुवाद : शोभा भागवत,
कजा कजा मरू प्रकाशन, पुणे,
पाने : 70 किंमत : 80 रुपये
त्याचा हा शोभा भागवत यांनी केलेला मराठी अनुवाद आहे.
अनेक लोकांना काम करण्याचा कंटाळा असतो. तुम्हा मुलांनाही आईनं सांगितलेली कामं करण्याचा कंटाळा येतो. शारिरीक कष्टाची कामं आई वा बाबांनीच किंवा त्यांच्यासारख्या मोठय़ा माणसांनीच करायची असतात, असं तुम्हाला वाटत असतं. पण बरीचशी मोठी माणसंही अशी कामं करायचा कंटाळा करतात. पण असा कंटाळा गांधीजींनी कधीच केला नाही. त्यांनी सगळी कामं आनंदानं केली. मग ते स्वत:चे कपडे स्वत: शिवणं असो, हातात खराटा घेऊन झाडू मारणं असो, आश्रमातली बाळं रात्रभर सांभाळणं असो, ताटात गहू घेऊन ते निवडणं असो, जात्यावर गहू दळणं असो, संडास साफ करणं असो, चरख्यावर सूत कातणं असो, स्वयंपाक करणं असो, स्वत:च्या चपला शिवणं असो..बापरे किती कामं करायचे गांधीजी! आणि ती सगळी आनंदानं करायचे. कारण स्वत:ची काम स्वत: करण्यात लाज बाळगायचं काहीच कारण नसतं. गांधीजी ती कधी बाळगतही नसत. या पुस्तकात गांधीजींच्या अशा 27 प्रकारच्या कामांची माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगितली आहे.
बॅरिस्टर, शिंपी, धोबी, भंगी, चांभार, नोकर, स्वयंपाकी, डॉक्टर, परिचारक, शिक्षक, विणकर, सूत काढणारे अशा जवळपास 27 भूमिका गांधीजी करायचे. त्यामुळे या पुस्तकाला खरं तर ‘बहुरूपी गांधी’ असंच नाव द्यायला हवं होतं.
बहुरूप गांधी : अनु बंदोपाध्याय,
मराठी अनुवाद : शोभा भागवत,
कजा कजा मरू प्रकाशन, पुणे,
पाने : 70 किंमत : 80 रुपये
No comments:
Post a Comment